मुंबई: लोकांना आशा होती की आजचा शेअर बाजार हा कालच्यापेक्षा वर जाईल, परंतु आज ही लोकांच्या हाती निराशा आली आहे. कारण कालच्या प्रमाणे आज सुद्धा शेअर बाजार घसरला (The stock market plummeted). आज ही बाजाराची चाल सुस्त आहे. सुरुवातीच्या सत्रात कमजोरी दिसून येत आहे. या संकेतवारुन स्पष्ट होते की आज सुद्धा याची चाल धिमी असणार आहे.
कसा उघडला बाजार आणि काय स्थिती -
आज बाजाराच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहिला मिळाली. सेन्सेकमध्ये सुरुवातीनंतर लगेच 882 अंकांनी घसरण पाहिला मिळत आहे. तसेच निफ्टी एकदम 17000 च्या स्तरावर उघडला आहे.
बाजार उघडल्यानंतर 15 मिनिटांनी व्यवहार -
बाजार उघडल्यानंतर 15 मिनिटांनी 9 वाजून 30 मिनिटांनी निफ्टी 167.80 अंक म्हणजे 0.98 टक्क्यांनी घसरुल्यानंतर 16,981 वर बाजारा करत आहे. आता निफ्टीमध्ये 1 टक्कयाहून कमीची घसरण पाहायला मिळत आहे.
प्री-ओपनिंग मध्ये बाजार -
बाजार उघडण्या अगोदर सेन्सेक्स 335.5 अंक म्हणजे 0.58 टक्यांच्या घसरणीनंतर 57,156 वर व्यवसाय दिसून येत होता आणि निफ्टीमध्ये सुद्धा 17,000 खाली दिसून येत होता.
शेअर बाजारासाठी दोन महिण्यांतील सर्वात खराब दिवस, सेन्सेक्स 1,546 अंकांनी घसरला -
देशांतर्गत शेअर बाजारात (Domestic stock market) सोमवारी दोन महिण्यातील सर्वात मोठी घसरण झाली. जागतिर पातळीवरील कमकुवत ट्रेंडमध्ये देशांतर्गत बाजारातील चौफेर विक्रीमुळे बीएसई सेन्सेक्स 1,546 अंकांनी घसरून 58,000 अंकांच्या खाली गेला. बीएसई सेन्सेक्सची सुरुवात घसरणीने झाली आणि एकेकाळी विक्रीच्या दबावामुळे तो 2,050 अंकांपेक्षा अधिक घसरून 56,984 अंकांच्या पातळीवर आला. पण नंतर त्यात काहीशी सुधारणा झाली आणि शेवटी तो 1,545.67 अंकांनी म्हणजे 2.62 टक्क्यांनी घसरून 57,491.51 वर बंद झाला.
अशाप्रकारे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (National Stock Exchange) निफ्टी 468.05 अंक म्हणजे 2.66 टक्के तोट्यात जाऊन 17,149.10 अंकावर बंद झाला. मागील वर्षी 26 नोव्हेंबरनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एका दिवसात झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे. हे सलग पाचवे व्यापारी सत्र आहे, जेव्हा बाजार खाली आला आहे. टाटा स्टीलचे शेअरचे जवळपास 3 टक्के तुटून स्रवाध्क तोट्यात राहिले. या व्यतिरिक्त बजाज फाइनेंस, विप्रो, टेक महिंद्रा, टाइटन, रिलायंस इंडस्ट्रीज और एचसीएल टेक मध्ये सुद्धा नुकसान झाले.
ज्युलियस बेअरचे कार्यकारी संचालक मिलिंद मुचाला म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारांवर लक्षणीय दबाव आहे. अलिकडच्या उच्चांकावरून ते 7 टक्क्यांनी खाली आले आहे... घसरण चौतर्फी आहे. अलीकडील आयपीओ असलेल्या नवीन युगातील कंपन्यांमध्ये ही घट अधिक तीव्र आहे. ते म्हणाले की, जागतिक बाजारात चलनवाढीची चिंता आहे. त्याचवेळी, यूएस फेडरल रिझर्व्हने पॉलिसी रेट वाढवण्याबद्दल देखील चिंता व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे जगातील इतर प्रमुख बाजारांच्या घसरणीसह देशांतर्गत बाजार खाली आले आहेत.
जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, जागतिक बाजारात विक्री, कमकुवत तिसर्या तिमाहीचे आर्थिक परिणाम आणि बजेटपूर्व घबराट यामुळे देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. उद्यापासून एफओएमसी (Federal Open Market Committee) च्या बैठकीपूर्वी भावनेवर विपरित परिणाम झाला. ते म्हणाले की गुंतवणूकदार एफओएमसीच्या दोन दिवसीय बैठकीच्या निकालाची वाट पाहत आहेत. फेडरल रिझर्व्ह पॉलिसी रेटमध्ये वाढ करण्याबाबत स्पष्ट संकेत देईल अशी अपेक्षा आहे. आशियातील इतर बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँग सेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी तोट्यात होता, तर जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय कंपोझिट वधारला होता. युरोपातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दुपारच्या व्यवहारात घसरण दिसून आली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.32 टक्क्यांनी वाढून 88.17 डॉलर प्रति बॅरल झाले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 17 पैशांनी घसरून 74.60 वर बंद झाला.
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार विदेशी संस्थागत गुंतवणूकदार भांडवल बाजारात निव्वळ विक्री करणारे होते. शुक्रवारी त्यांनी 3,148.58 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.