ETV Bharat / business

सुवर्ण रोखे खरेदी करण्याची संधी; प्रति ग्रॅम ४,६६२ रुपये किंमत निश्चित

author img

By

Published : Feb 27, 2021, 6:47 PM IST

सार्वभौम सुवर्ण रोखे (सिरीज १२ ) हे १ मार्चला खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. तर ५ मार्चला खरेदी प्रक्रिया बंद होणार आहे.

Sovereign Gold Bond
सुवर्ण रोखे खरेदी

बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत - नव्या श्रेणीतील सार्वभौम सुवर्ण रोख्यांची (सोव्हर्जिअन गोल्ड बाँड्स) किंमत निश्चित करण्यात आली आहे. प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ही ४,६६२ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

सार्वभौम सुवर्ण रोखे (सिरीज १२ ) हे १ मार्चला खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. तर ५ मार्चला खरेदी प्रक्रिया बंद होणार आहे. ऑनलाईन अथवा डिजीटल देयक प्रणालीचा वापर केल्यास सुवर्ण रोख्यांवर प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत देण्याची आरबीआयने घोषणा केली आहे. या पद्धतीने सुवर्णरोखे खरेदी केल्यास प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ४,६१२ रुपये असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ९ मार्च ही सेटलमेंटसाठी तारीख निश्चित केली आहे.

हेही वाचा-प्लास्टिकचा कमी वापर असलेली खेळणी तयार करा- पंतप्रधानांचे उद्योगांना आवाहन

  • असा मिळतो फायदा-

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेवर व्याज देण्यात येते. तसेच रोखे कर्जासाठी तारण ठेवता येतात.

  • येथे खरेदी करता येतात सुवर्ण रोखे-

बँक, स्टॉक होल्डिंग कॉरपरेशन ऑफ इंडिया लि. (एसएचसीआईएल), डाकघर, मान्यताप्रात शेअर बाजारामधून सुवर्ण रोखे खरेदी करता येणे शक्य आहे.

हेही वाचा-ऐन लग्नसराईत जळगावात चांदी दीड हजारांनी तर सोने ५०० रुपयांनी स्वस्त

  • इतकी करता येते गुंतवणूक-

सुवर्ण रोख्यामध्ये १ ग्रॅम सोन्यापर्यंत गुंतवणूक करता येते. तर जास्तीत जास्त ४ किलोपर्यंत गुंतवणूक करता येते. धर्मादाय संस्थांसह इतर संस्थांना एका वर्षात २० किलोपर्यंत सोन्यावर गुंतवणूक करता येते. सुवर्ण रोख्यामध्ये १ ग्रॅम सोन्यापर्यंत गुंतवणूक करता येते. तर जास्तीत जास्त ४ किलोपर्यंत गुंतवणूक करता येते. धर्मादाय संस्थांसह इतर संस्थांना एका वर्षात २० किलोपर्यंत सोन्यात गुंतवणूक करता येते.

  • यामुळे सरकारने सुरू केले सुवर्ण रोखे-

भारतीयांचा सोने खरेदीकडे असलेला कल लक्षात घेवून मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेला २०१५ मध्ये सुरुवात केली होती. योजनेसाठी फक्त भारतीय नागरिक, धर्मादाय संस्था, कंपन्या, ट्रस्ट आदी अर्ज करू शकतात. एक ग्रॅम सोन्यासाठी एक रोख्यात गुंतवणूक करण्यात येते. भौतिक सोन्याची कमी मागणी होण्यासाठी सरकारकडून सुवर्ण रोखे बाजारात आणण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.