मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे देशातील शेअर बाजारात तेजी निर्माण झाली आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ८३४ अंशाने वधारला आहे. एचडीएफसी ट्विन्स, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ८३४.०२ अंशाने वधारून ४९,३९८.२९ वर स्थिरावला . मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांकही दिवसाखेर २३९.८५ अंशाने वधारून १४,५२१.१५ वर स्थिरावला.
हेही वाचा-व्हॉट्सअपने गोपनीयतेचे धोरण मागे घ्यावे; केंद्राची कंपनीला सूचना
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
बजाज फिनसर्व्हचे शेअर सर्वाधिक सुमारे ७ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. बजाज फायनान्स, एचडीएफसी, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, सन फार्म आणि एनटीपीसीचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे टेक महिंद्रा, आयटीसी आणि एम अँड एमचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-पेट्रोल मुंबईत प्रति लिटर ९२ रुपयांच्या घरात; सामान्यांच्या खिशाला झळ
या कारणाने कंपन्यांचे वधारले शेअर-
रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी यांच्या माहितीनुसार जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे देशातील शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी ट्रेझरीच्या सचिवपदी फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष जेनेट येलेन यांची निवड केली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संसदेला मंदीविरोधात लढण्यासाठी अधिक बळ मिळणार आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर १.२२ टक्क्यांनी वधारून ५५.४२ प्रति बॅरल आहेत.