मुंबई - इराण-अमेरिकेतील तणाव स्थिती निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६३५ अंशाने वधारला आहे. तर निफ्टीने १२,२०० चा टप्पा ओलांडला आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ६३४.६१ अंशाने वधारून ४१,४५२.३५ वर स्थिरावला. तर निफ्टीही १९०.५५ अंशाने वधारून १२,२१५.९० वर स्थिरावला.
हेही वाचा-अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पंतप्रधानांचे अर्थसंकल्पावर वैयक्तिक लक्ष
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
आयसीआयसीआय बँकेचे सर्वाधिक ३.८० टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ एसबीआय, एम अँड एम, इंडुसइंड बँक, मारुती सुझुकी, एशियन पेंटस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत. टीसीएस, एचसीएल टेक, एनटीपीसी आणि सन फार्माचे शेअर १.७३ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ : पंतप्रधान मोदी अर्थतज्ज्ञांची नीती आयोगात घेणार भेट
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी शांतता प्रस्थापित करण्याचे विधान केले आहे. दोन्ही तेल उत्पादक देशांमधील तणावाची स्थिती कमी झाली आहे. तसेच चीनचे उपपंतप्रधान लियू हे पुढील आठवड्यात तात्पुरता व्यापारी करार करण्यासाठी वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सकारात्मक झाले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारून ७१.४३ रुपयावर पोहोचला आहे.