ETV Bharat / business

शेअर बाजाराचा निर्देशांक १,१४८ अंशाने वधारला; वित्तीय कंपन्यांचे शेअर तेजीत

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,१४७.७६ अंशाने वधारून ५१,४४४.६५ वर स्थिरावला. २ फेब्रुवारीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक एका दिवसात सर्वाधिक अंशाने वधारला आहे.

share market
शेअर बाजार
author img

By

Published : Mar 3, 2021, 4:51 PM IST

मुंबई - सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर सुमारे १,१४८ अंशाने वधारला आहे. वित्तीय आणि उर्जा कंपन्यांचे शेअर वधारल्याने शेअर बाजारात तेजीचे चित्र निर्माण झाले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,१४७.७६ अंशाने वधारून ५१,४४४.६५ वर स्थिरावला. २ फेब्रुवारीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक एका दिवसात सर्वाधिक अंशाने वधारला आहे. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर ३२६.५० अंशाने वधारून १५,२४५.६० वर स्थिरावला.

हेही वाचा-पेपल भारतामध्ये १ हजार अभियंत्यांना देणार नोकऱ्या

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि अ‌ॅक्सिस बँकेचे शेअर वधारले आहेत. ३० क्षेत्रनिहाय निर्देशांकांपैकी २७ क्षेत्रांचे निर्देशांक वधारले आहेत.

हेही वाचा-इफ्फकोकडून बिगर युरिया खतांच्या किमती राहणार 'जैसे थे'

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय भांडवली बाजारामधून शुक्रवारी २,२२३.१६ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १.८४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६३.७७ डॉलर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.