ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक २४७ अंशाने घसरून बंद; गॅससह आयटी कंपन्यांना फटका

येस बँकेचे शेअर सर्वात अधिक १०.०५ टक्क्यांनी घसरले. तर पॉवरग्रीड, इंडुसइंड बँक, एनटीपीसी, आयटीसी, टीसीएस, अॅक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम आणि एचसीएल टेकचे शेअर हे २.६६ टक्क्यापर्यंत घसरले

Bombay stock Exchange
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Dec 10, 2019, 6:05 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक २४७ अंशाने घसरून ४०,२३९ वर स्थिरावला. उर्जा, कच्चे तेल, गॅस आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. त्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली.

मुंबई शेअर बाजार खुला होताच वधारून ४०,५८८.८१ वर पोहोचला. तर बंद होताना २४७.५५ अंशाने घसरून ४०,२३९.८८ वर स्थिरावला. निफ्टी निर्देशांक ८०.७० अंशाची घसरण होऊन ११,८५६.८० वर स्थिरावला.

हेही वाचा - केंद्रीय जीएसटीत एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये ४० टक्क्यांची घट

या कंपन्यांचे शेअर घसरले वधारले-

येस बँकेचे शेअर सर्वात अधिक १०.०५ टक्क्यांनी घसरले. तर पॉवरग्रीड, इंडुसइंड बँक, एनटीपीसी, आयटीसी, टीसीएस, अॅक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम आणि एचसीएल टेकचे शेअर हे २.६६ टक्क्यापर्यंत घसरले. बजाज फायनान्स, एचयूएल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटोचे शेअर हे १.०६ टक्क्यापर्यंत वधारले.
दरम्यान, रुपया डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी वधारून ७०.९३ वर पोहोचला.

हेही वाचा-अखेर ह्युदांई मोटार इंडियाही वाढविणार वाहनांच्या किंमती

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.