मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ३४४ अंशाने घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एल अँड टी अशा मोठ्या कंपन्यांचे शेअर घसरल्याने शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३३३.९३ अंशाने घसरून ५१,९४१.६४ वर स्थिरावला. एनएसई निफ्टीचा निर्देशांक १०४.७५ अंशाने घसरून १५,६३५.४५ वर स्थिरावला.
हेही वाचा-ह्युंदाई अलकाजार एसयूव्हीची बुकिंग आजपासून सुरू
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
एल अँड टीचे शेअर सर्वाधिक सुमारे २ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एसबीआय, मारुती, अॅक्सिस बँक आणि बजाज ऑटोचे शेअर घसरले आहेत. दुसरीकडे पॉवरग्रीड, एनटीपीसी, टायटन, एचसीएल टेक आणि एशियन पेंट्सचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-नोटा छापणे हा आरबीआयपुढे शेवटचा पर्याय असायला पाहिजे- डी. सुब्बाराव
रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ रणनीतीतज्ज्ञ विनोद मोदी म्हणाले, की ऑटो कंपन्या, वित्तीय कंपन्या आणि रिलायन्सच्या शेअरवर विक्रीचा दबाव निर्माण झाला. त्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.३६ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७२.४८ डॉलर आहेत.