ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजारात ५८० अंशाने पडझड; 'हे' आहे कारण - Share market live news

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५८०.०९ अंशाने घसरून ४३,५९९.९६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १६६.५५ अंशाने घसरून १२,७७१.७० वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजार न्यूज
मुंबई शेअर बाजार न्यूज
author img

By

Published : Nov 19, 2020, 5:01 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ५८० अंशाने घसरला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक १२,८००हून कमी आहे. जागतिक बाजारात प्रतिकूल स्थिती आहे. अशात गुंतवणूकदारांनी नफा नोंदवून वित्तीय कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री केली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५८०.०९ अंशाने घसरून ४३,५९९.९६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १६६.५५ अंशाने घसरून १२,७७१.७० वर स्थिरावला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्वाधिक सुमारे ५ टक्क्यांनी शेअर घसरले. त्या पाठोपाठ अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेलचे शेअर घसरले. पॉवरग्रीड, आयटीसी, एनटीपीसी, टाटा स्टील आणि टायटनचे शेअर वधारले.

न्यूयॉर्कमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आर्थिक निर्बंधाची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात निर्देशांक वधारला होता. बहुतांश क्षेत्रांच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.६५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ४४.०५ डॉलर आहेत.

शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात २०० अंशाने घसरला आहे. सकाळच्या सत्रात एचडीएफसी ट्विन्स, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस कंपन्याचे शेअर घसरले. जागतिक बाजारात प्रतिकूल स्थिती असल्याने शेअर बाजारात नकारात्मक पडसाद उमटले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.