मुंबई - विदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील (एफपीआय) अधिभार कर मागे घेण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घेतल्यानंतर आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. बँकिंगसह इतर कंपन्यांचे शेअर वधारले. शेअर बाजार बंद होताना ७९३ अंशाने वधारून ३७,४९४.१२ वर बंद झाला.
निफ्टीचा निर्देशांक २२८.५० अंशाने वधारून ११,००० चा टप्पा गाठला. शेअर बाजार व निफ्टीचा वधारलेला आजचा निर्देशांक हा मे २० नंतरचा एका दिवसात वधारलेला सर्वोच्च निर्देशांक आहे.
अमेरिका व चीनमध्ये व्यापारी युद्ध सुरू असताना भारतीय शेअर बाजाराने तेजी अनुभवली आहे.
या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले-
येस बँकेचे शेअर सर्वात अधिक वधारले. त्यानंतर एचडीएफसी, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, एसबीआय, अॅक्सिस बँक आणि कोटक बँकेचे शेअर हे ५.२४ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. तर टाटा स्टील, सन फार्मा, हिरो मोटोकॉर्प, वेदांत, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि बजाज ऑटोचे शेअर हे २.०१ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देणारे धोरण शुक्रवारी जाहीर केले. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजार वधारल्याचे एव्हीपी एक्विटी रिसर्चचे नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले.