ETV Bharat / business

लोकसभा निवडणूक निकालापूर्वी शेअर बाजारात ५३७ अंशाची उसळी - Exit polls result

रविवारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. स्थिर सरकार स्थापन होईल, असे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील शेअरची खरेदी झाल्याचे सेंट्रम ब्रोकिंगचे संशोधन प्रमुख जगनधाम थुनुगुंटला यांनी सांगितले.

शेअर बाजार
author img

By

Published : May 17, 2019, 5:52 PM IST

मुंबई - मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५३७ अंशाने उसळी घेतली. तर निफ्टीने पुन्हा ११, ४०० अंशाचा टप्पा ओलांडला. निवडणुकीचे निकालापूर्वी शेअर बाजाराने आज तेजी अनुभवली आहे.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५३७.२९ अंशाने वधारून ३७,९३० वर बंद झाला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १५०.०५ अंशाने वधारून ११,४०५.१५ वर पोहोचला. आठवडाभरात शेअर बाजाराचा निर्देशांक हा ४६७.७८ अंशाने सावरला आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकात १२८.२५ अंशाने वाढला आहे.

या कंपन्यांचे शेअरचे दर वधारले-घसरले-

बजाज फायनान्सचे शेअर सर्वात अधिक ६.०९ टक्क्याने वधारले. कंपनीने मार्चमध्ये तिमाहीदरम्यान ५० टक्के निव्वळ नफा नोंदविला आहे. हिरो मोटोकॉर्प, मारुती, कोटक बँक, एचडीएफसी, एचयूएल, एम अँड एम, एचडीएफसी बँक, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोल इंडिया, एसबीआय, इंडुसलँड बँक आणि एशियन पेंटसचे शेअर वधारले. या कंपन्यांचे शेअर ४.२६ टक्क्यापर्यंत वाढल्याचे दिसून आले. येस बँक, वेदांत, इन्फोसिस, एचसीएल टेक, सन फार्मा, टीसीएस आणि एनटीपीसीचे शेअर हे २.३६ टक्क्यापर्यंत घसरले.

रविवारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. स्थिर सरकार स्थापन होईल, असे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील शेअरची खरेदी झाल्याचे सेंट्रम ब्रोकिंगचे संशोधन प्रमुख जगनधाम थुनुगुंटला यांनी सांगितले. निवडणुकीनंतर स्थिर सरकार आणि सुधारणांमध्ये सातत्य गुंतवणुकदारांना अपेक्षित आहे.

Intro:Body:

SHRIKANT PAWAR

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.