मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक १७२.६१ अंशाने घसरून ३९,७४९.८५ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ५८.८० अंशाने घसरून ११,६७०.८० वर स्थिरावला.
आज दुपारनंतर शेअर बाजारात धातू, वाहन, स्थावर मालमत्ता आणि वित्तीय संस्थांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ३.१५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ३८.३९ बॅरल झाले आहेत.
या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण
एल अँड टीच्या शेअरमध्ये सुमारे ५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यापाठोपाठ टायटन, ओएनजीसी, अॅक्सिस बँक, एचयूएल, एम अँड एम आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. एशियन पेंट्स, अल्ट्रा टेक सिमेंट, एचसीएल टेक, कोटक बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत.