मुंबई - शेअर बाजाराने सोमवारी पडझड अनुभवल्यानंतर आज सकाळच्या सत्रात शेअर बाजार सावरला आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकात १७० अंशाची वाढ झाली. तर निफ्टीचा निर्देशांक ३८.७० अंशाने वधारला आहे. बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमुळे हा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार जागतिक आर्थिक मंचावर प्रतिकूल परिस्थिती असतानाही बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगली गुंतवणूक झाली आहे. विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी सोमवारी ९४८.९८ कोटींच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणुकदार संस्थांनी ८९.८९ कोटींच्या शेअरची खरेदी केली आहे.
या कंपन्यांच्या शेअरमध्ये झाले चढ-उतार
वेदांता, कोल इंडिया, हिरो मोटो कॉर्प, टीसीएस, एसबीआय, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, पॉवर ग्रीड, येस बँक, टाटा मोटर्स, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये १.८३ टक्के वाढ झाली. तर इंडुसलँड बँक, ओएनजीसी, आरआयएल, सन फार्मा, एचसीएल टेक आणि भारती एअरटेलच्या शेअरमध्ये १.९२ टक्क्यांची घसरण झाली.