मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक सलग सहाव्या सत्रात वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराने दिवसाखेअर ६१७ अंशाने वधारून ५१,००० चा टप्पा ओलांडला आहे. हा शेअर बाजाराचा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ६१७.१४ अंशाने वधारून ५१, ३४८.७७ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १९१.५५ अंशाने वधारून १५,११५.८० वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराने दिवसभरात ५१,५२३.३८ अंशाचा उच्चांक गाठला होता. निफ्टीने दिवसभरात १५,१५९.९० हा उच्चांक गाठला होता.
हेही वाचा-सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
मुंबई शेअर बाजारात महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर सर्वाधिक ७ टक्क्यांनी वधारले. बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले. तर एचयूएल, कोटक बँक, बजाज फायनान्स आणि आयटीसीचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-लग्नसराईतही सोन्याची चमक फिक्की; आठवडाभरात किमतीत दीड हजारांची घसरण
रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी म्हणाले, की आर्थिक सुधारणांमुळे भांडवली खर्चात वाढ झाली आहे. धाडसी उपाययोजना केल्याने गुंतवणुकदारांचा विश्वास वाढला आहे. जगभरातील शेअर बाजारातील सकारात्मक स्थितीचाही आज शेअर बाजारावर चांगला परिणाम झाला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.७६ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६०.०१ डॉलर आहेत.