मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ५९५ अंशांनी वधारून ३२,२००.५९ वर स्थिरावला. तर एचडीएफसी ट्विन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत. जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती असल्याने शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे.
सलग दुसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजारात निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचाही निर्देशांक १७५.१५ अंशांनी वधारून ९,४१०.१० वर स्थिरावला.
हेही वाचा-स्टेट बँकेचा धक्का; एकाच महिन्यांदा दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
एल अँड टीचे सर्वाधिक ६ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, इंडुसइंड बँक, मारुती, एचडीएफसी बँक आणि एचसीएल टेकचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे आयटीसी, एसबीआय आणि भारती एअरटेलचे शेअर घसरले आहेत.
अनेक डेरिटिव्हजची मुदत मे महिन्यात संपत आहे. त्यामुळे कंपन्यांचे शेअर वधारल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा खुल्या होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती आहे. देशातील गुंतवणूकदारांनीही सकारात्मक प्रतिसाद देत शेअर खरेदी केली आहे.
हेही वाचा-मास्क हीच तुमची नवी ओळख; गुजरातच्या फोटोग्राफरने 'असा' शोधून काढला जुगाड
कच्च्या खनिज तेलाचे दर जागतिक बाजारात ०.९२ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ३४.९२ डॉलर झाले आहेत. घसरणीनंतर रुपयाचे मूल्य एका डॉलरच्या तुलनेत ७५ रुपये ७६ पैसे झाले आहे.