मुंबई - शेअर बाजार खुला होताना ४०० हून अधिक अंशांनी निर्देशांक वधारला. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने एचडीएफसी ट्विन्स, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या मोठ्या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ३१,०८६.७० वर पोहोचला. त्यानंतर निर्देशांक ३७३.६७ अंशांनी वधारून ३१,०४६.२६ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक १०८.७० अंशांनी वधारून ९,१४७.९५ वर पोहोचला.
हेही वाचा-...म्हणून एन-९५ मास्क देशात ४७ टक्क्यांनी झाले स्वस्त
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
आयटीसी कंपनीचे सर्वाधिक ४ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ इंडुसइंड बँक, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट आणि एल अँड टीचे शेअर वधारले आहेत. भारती एअरटेल, टीसीएस, हिरो मोटोकॉर्प आणि इन्फोसिसचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-नोकर कपातीचे संकट : लाईव्ह स्पेसच्या ४५० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक २६०.३१ अंशांनी घसरून ३०,६७२.५९ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ६७ अंशांनी घसरून ९,०३९.२५ वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी १,३५३.९० कोटी रुपयांचे शेअर भांडवली बाजारात विकले होते. दरम्यान, ईद-उल-फित्रमुळे सोमवारी शेअर बाजार बंद होते.