मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ३१४.७३ अंशाने वधारून ४३,९५२.७१ वर स्थिरावला. शेअर बाजाराने 44,161.16 हा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक गाठला होता. धातू, उद्योग, बँक आणि वित्तीय कंपन्यांचे शेअर वधारल्याने शेअर बाजारात तेजी दिसून आली.
मुंबई शेअर बाजारापोठापाठ निफ्टीचा निर्देशांक ९३.९५ अंशाने वधारून १२,८७४.२० वर स्थिरावला.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
टाटा स्टीलचे सर्वाधिक सुमारे ६ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ एसबीआय, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, एलटी, मारुती, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले. तर दुसरीकडे एनटीपीसी, एचसीएल टेक, ओएनजीसी, इन्फोसिस, आयटीसी, पॉवरग्रीड आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.२५ टक्क्यांनी घसरून ४३.७१ डॉलर आहेत.
सकाळच्या सत्रात शेअर बाजारात अशी होती स्थिती
अमेरिकन औषध कंपनी मॉडर्नाने तयार केलेली कोविड लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याची घोषणा आज (मंगळवारी) सकाळी केली आहे. या घोषणेनंतर भारती शेअर बाजाराने निर्देशांकात नवीन विक्रम गाठला आहे. शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ४४ हजार १६१.१६ वर पोहोचला. दर दुसरीकडे निफ्टी १२,८५४.२५ वर होता. त्यानंतर ७४ अंशाने वधारला. निफ्टी आतापर्यंतच्या सर्वाधिक १२,९३४.०५ अंशावर पोहोचला आहे.