मुंबई - शेअर बाजारातील तेजी अजूनही कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६८९ अंशाने दिवसाखेर वधारल्याने नवा उच्चांक नोंदविला आहे. इन्फोसिस, टीसीएस आणि रिलायन्सचे शेअर वधारले
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ६८९.१९ अंशाने वधारून ४८,७८२.५१ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर २०९.९० अंशाने वधारून १४,३४७.२५ वर स्थिरावला.
हेही वाचा-दिलासादायक! नोकरी भरतीत डिसेंबरमध्ये १४ टक्क्यांनी वाढ
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
मारुतीचे शेअर सुमारे ६ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ टेक महिंद्रा, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रीड आणि एनटीपीसीचे शेअर वधारले. दुसरीकडे इंडसइंड बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी, एचडीएफसीचे शेअर घसरले.
रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख रणनीतीकार विनोद मोदी म्हणाले की, अमेरिकेच्या संसदेने जो बिडेन यांच्या विजयाला पुष्टी दिल्याने जागतिक शेअर बाजार वधारला आहे. अमेरिकेकडून आणखी आर्थिक पॅकेज दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून; सीसीपीएने दिले संकेत
यापूर्वी अमेरिकेच्या संसदेच्या हल्ल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता होती. देशात कोरोनाच्या लसीची मोहिम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शेअर बाजार निर्देशांकाचा नवा उच्चांक गाठेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ०.५९ टक्क्यांनी वधारून ५४.७० डॉलर आहे.