मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ५०४ अंशाने वधारला. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी ट्विन्स आणि एसबीआयचे शेअरही वधारले आहेत.
जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५०३.५५ अंशाने वधारून ४०,२६१.१३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १४४.३५ अंशाने वधारून ११,८१३.५० वर स्थिरावला.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
आयसीआयसीआय बँकेचे सर्वाधिक ६ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले. त्यापाठोपाठ एसबीआय, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड, सन फार्म, इंडसइंड बँक, टायटन, बजाज ऑटो आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले. एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक आणि इन्फोसिसचे शेअर घसरले.
आंततराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ३.३१ टक्क्यांनी वाढून ४०.२६ डॉलर आहेत.