ETV Bharat / business

दिवसाखेर शेअर बाजार निर्देशांक ४३२ अंशाने वधारला; वित्तीय संस्थांच्या शेअरमध्ये तेजी - Share market today news

भविष्यातील सौद्यात असलेल्या शेअरची मुदत संपत असताना मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी करण्यात आली. बँकिंग, वित्तीय सेवा, विमा कंपन्या व धातुंच्या (बीएफएसआय) शेअरच्या किमती वाढल्या आहेत.

शेअर बाजार
शेअर बाजार
author img

By

Published : Nov 26, 2020, 6:04 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ४३१.६४ अंशाने वधारून ४४,२५९.७४ वर स्थिरावला. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती आणि भविष्यातील सौद्यात असलेल्या शेअरच्या मुदत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे.

मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांकही १२८.६० अंशाने वधारून १२,९८७ वर स्थिरावला.

टाटाचे सर्वाधिक वधारले शेअर; इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये घसरण

टाटा स्टीलचे सर्वाधिक सुमारे ५ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, बजाज ऑटो, एचडीएफसी, एचसीएल टेक आणि टायटनचे शेअर वधारले. दुसरीकडे मारुती, ओएनजीसी, इंडसइंड बँक आणि टेक महिंद्राचे शेअर घसरले.

हेही वाचा-26/11: भविष्यातही एकतेसह संवेदनशीलता दाखविण्याचे रतन टाटांचे आवाहन

बीएफएसआयएसमुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ-

भविष्यातील सौद्यात असलेल्या शेअरची मुदत संपत असताना मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी करण्यात आली. बँकिंग, वित्तीय सेवा, विमा कंपन्या व धातुंच्या (बीएफएसआय) शेअरच्या किमती वाढल्या आहेत. बीएफएसआयएस हे शेअर बाजाराला पुढे नेण्यात महत्त्वाचे ठरल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख (रणनीती) विनोद मोदी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १.३२ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ४७.८९ डॉलर राहिले आहेत.

हेही वाचा-'देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा अपेक्षेहून अधिक'

आरबीआय गव्हर्नरकडून अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक मत-

देशाची अर्थव्यवस्थेचा विकासदर हा अपेक्षेहून सुधारत असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. ते फॉरेन एक्सचेंज डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफईडीएआय) चौथ्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर बाजाराच्या अपेक्षेचे पूनर्मुल्यांकन करावे लागणार असल्याची शक्यता दास यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.