ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक ३९६ अंशाने वधारून बंद; उपलब्धकालीन शेअरची मुदत संपल्याचा परिणाम

शेअर बाजार निर्देशांक ३९६.२२ अंशाने वाढून ३८,९८९.७४ वर पोहोचला, तर निफ्टीचा निर्देशांक हा १३३.१० अंशाने वधारून ११,५७३.३० वर पोहोचला. पुढील आठवड्यात आरबीआय तिमाही पतधोरण जाहीर करत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार हे आशावादी आहेत.

संग्रहित - शेअर बाजार
author img

By

Published : Sep 26, 2019, 5:40 PM IST

मुंबई - आयसीआयसीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी आणि मारुतीच्या उपलब्धकालीन शेअरची (फ्युचर अँड ऑप्शन) सप्टेंबरमधील मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीसह जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजार निर्देशांक ३९६ अंशाने वधारला आहे. बँकिंग व ऑटो कंपन्यांचे शेअर वधारल्याचे दिसून आले.

शेअर बाजार निर्देशांक ३९६.२२ अंशाने वाढून ३८,९८९.७४ वर पोहोचला, तर निफ्टीचा निर्देशांक हा १३३.१० अंशाने वधारून ११,५७३.३० वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
वेदांत, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ओएनजीसी, मारुती, इंडसइंड बँक, एल अँड टी, हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स आणि कोटक बँकेचे शेअर ६.४७ टक्क्यांनी वधारले, तर येस बँक, इन्फोसिस, एचयूएल, एचसीएल टेक, एचडीएफसी, एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि टीसीएसचे शेअर ४.९३ टक्क्यांनी घसरले.

हेही वाचा-पीएमसीच्या खातेदारांना दिलासा; खात्यामधून १० हजार रुपयापर्यंत काढता येणार रक्कम

फ्युचर्स व ऑप्शन्स शेअर म्हणजे काय?

भविष्यकाळात शेअरची खरेदी करण्याचे नियोजन उपलब्धकालीन शेअरमध्ये (फ्युचर्स व ऑप्शन) असते. तसेच नुकसान टाळण्यासाठी खरेदी टाळण्याचा विकल्पही असतो.

हेही वाचा-आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी 'या' महिला अर्थतज्ज्ञाची नियुक्ती

शेअर बाजार निर्देशांक वधारण्याची ही आहेत कारणे-

  • चीनबरोबरील व्यापारी करार हा अपेक्षेहून कमी वेळेत पूर्णत्वाला येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केले. त्यामुळे देशातील गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी केल्याने शेअर बाजार निर्देशांक वधारल्याचे व्यापाऱ्यांनी (ट्रेडर्स) सांगितले.
  • पुढील आठवड्यात आरबीआय तिमाही पतधोरण जाहीर करत असल्याच्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदार हे आशावादी आहेत.
  • सप्टेंबरमध्ये विविध कंपन्यांच्या उपलब्धकालीन शेअरची मुदत संपणार असल्याने शेअर बाजार निर्देशांक वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.