मुंबई - जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक कल आणि अखंडित परदेशी निधी बाहेर पडताना मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स (Sensex) शुक्रवारी जवळपास 1300 अंकांपेक्षा अधिक घसरला.
निफ्टी 17 हजारवर
30 शेअर्सचा निर्देशांक 810.29 अंक किंवा 1.38 टक्क्यांनी घसरून 57, 984.80वर ट्रेडिंग करत होता. निफ्टी (nifty) 245. 15 अंक किंवा 1.40 टक्क्यांनी घसरून 17, 291.10वर आला. सेन्सेक्स पॅकमध्ये मारुती सर्वाधिक 3 टक्क्यांनी घसरला, त्यानंतर बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, डॉ. रेड्डीज आणि सन फार्मा वाढले.
RILमधील तेजी
मागील सत्रात, सेन्सेक्स 454.10 अंकांनी किंवा 0.78 टक्क्यांनी वाढून 58, 795.09वर बंद झाला आणि निफ्टी 121.20 अंकांनी किंवा 0.70 टक्क्यांनी वाढून 17,536.25वर बंद झाला. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, जेव्हा निफ्टीमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त वजन असलेला स्टॉक 6 टक्क्यांनी वाढतो, तेव्हा तो निर्देशांकात जास्त प्रमाणात चढ-उतार करेल. हे गुरुवारी घडले, जेव्हा RILमधील तेजीने निफ्टीला 121 अंकांनी वर नेले.