मुंबई - शेअर बाजार बाजार निर्देशांक दिवसभरात ९३९ अंशांनी वधारला. मात्र, कोरोनाचे देशात आणखी दोन रुग्ण आढळल्यानंतर १५३.२७ अंशांनी निर्देशांक घसरून ३८,१४४.०२ वर स्थिरावला आहे.
मुंबई शेअर बाजारात सलग सातव्या सत्रात घसरण झाली आहे. निफ्टीचा निर्देशांक ६९ अंशांनी घसरून ११,१३२.७५ वर स्थिरावला होता. गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याने शेअर बाजार खुला होताना ७५० अंशांनी वधारला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर शेअर बाजार निर्देशांकात सुमारे १,३०० अंशांनी घसरण झाली.
हेही वाचा-टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत फेब्रुवारीमध्ये ३४ टक्क्यांनी घसरण
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एसबीआय, टाटा स्टील, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, ओएनजीसी आणि इंडसइंड बँकेचे शेअर घसरले आहेत. तर एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-नोकिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा; सांगितले 'हे' कारण