मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 383 अंशाने वधारला आहे. जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती असताना एचडीएफसी बँक, एल अँड टी आणि टायटनचे शेअर वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 382.95 अंशाने वधारून 52,232.43 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 114.15 अंशाने वधारून 15,690.35 वर स्थिरावला.
हेही वाचा-कोरोनातही रिलायन्सची घौडदौड : ओलांडला भांडवली मुल्यात 14 लाख कोटींचा टप्पा
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
टायटनचे सर्वाधिक सुमारे 7 टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्या ओएनजीसी, एल अँड टी, कोटक बँक, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले आहेत. दुसरीकडे इंडसइंड बँक, पॉवरग्रीड, बजाज ऑटो, एम अँड एम आणि डॉ. रेड्डीजचे शेअर घसरले आहेत. वित्तीय सेवा कंपन्यांनी शेअर बाजार सावरल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे. त्यापाठोपाठ एफएमसीजी आणि धातू कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. आयटी, फार्मा आणि ऑटो कंपन्यांच्या शेअर विक्रीवर काही प्रमाणात दबाव दिसून आला आहे.
हेही वाचा-चीनची हुवाई अमेरिकेच्या गुगलला देणार टक्कर; स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टिम लाँच
रिलायन्सच्या भांडवली बाजार मुल्याने ओलांडला 14 लाख कोटींचा टप्पा
कोरोना महामारीतही रिलायन्स इंडस्ट्रीजची घौडदौड सुरुच आहे. सलग सातव्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आज वधारले आहेत. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवली बाजार मुल्याने सकाळच्या सत्रात 14 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर सात सत्रांमध्ये एकूण 14.53 टक्क्यांनी वधारले होते. मुंबई शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअरची किंमत 2,250 रुपयांवर पोहोचली आहे. शेअरच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने रिलायन्सचे भांडवली मूल्य हे 14,04,123.26 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.18 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 71.22 डॉलर आहेत.