ETV Bharat / business

पतधोरण जाहीर होण्यापूर्वी गुंतवणुकदारांचा सावध पवित्रा ; शेअर बाजाराच्या निर्देशांकात १५२ अंशाची घसरण - आरबीआय पतधोरण

राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) आणि जीएसटीचे करसंकलन हे अपेक्षेहून कमी झाले आहे. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदार हे आरबीआयचे धोरण आणि अर्थव्यवस्थेबाबतचे भाष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

शेअर बाजार
author img

By

Published : Jun 4, 2019, 1:14 PM IST

मुंबई - शेअर बाजार व निफ्टीत शेअर खरेदी करताना गुंतवणुकदारांनी सकाळच्या सत्रात सावधगिरीची भूमिका घेतली. आरबीआय गुरुवारी रेपो दर जाहीर करणार असल्याने गुंतवणुकदारांनी ही भूमिका घेतल्याचे दिसून आले.

सकाळच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक १५२ अंशाने घसरून ४०,११७.८५ वर पोहोचला. तर निफ्टीच्या निर्देशांकात ५३.९० अंशाची घसरण होवून १२,०३३.४५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले-
एचसीएल टेक, टीसीएस, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, इन्फोसिस, बजाज ऑटो, एचयूएल आणि मारुती कंपनीचे शेअर २ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. येस बँक, एनटीपीसी, पॉवरग्रीड, एल अँड टी, टाटा मोटर्स आणि आयटीसीचे शेअर २.६४ टक्क्याने वाढले आहेत.

सोमवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ५५३.४२ अंशाने वधारून ४०,२६७.६२ वर पोहोचला होता. शेअर बाजाराने बंद होण्यापूर्वी आजपर्यंतचा सर्वोच्च असा ४०,३०८ निर्देशांक गाठला होता. तर निफ्टीच्या निर्देशांक १६५.७५ अंशाने वाढून १२,०८८.५५ वर पोहोचला होता.

काय आहे बाजार विश्लषेकांचे मत-
राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) आणि जीएसटीचे करसंकलन हे अपेक्षेहून कमी झाले आहे. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदार हे आरबीआयचे धोरण आणि अर्थव्यवस्थेबाबतचे भाष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दर किमान २५ बेसिस पाँईटने कमी करेल, अशी आशा असल्याचे सँक्टम वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सुनिल शर्मा यांनी सांगितले.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी ३ हजार ६८.८८ कोटी शेअरची खरेदी केली. तर देशातील वित्तीय संस्थांनी ४६२.६९ कोटी शेअरची विक्री केल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.