ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा पाचव्या दिवशीही उच्चांक

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९०० अब्ज डॉलर रुपयांच्या कोरोनावरील आर्थिक पॅकेजवर स्वाक्षरी केली आहे. कोरोनावरील लस देशात विकसित होण्याच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. त्याचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

शेअर बाजार
शेअर बाजार
author img

By

Published : Dec 29, 2020, 4:57 PM IST

मुंबई - शेअर बाजाराच्या निर्देशांकात सलग पाचव्या सत्रात नवा उच्चांक नोंदविला आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २५९.३३ अंशाने वधारून ४७,६१३.०८ वर पोहोचला. मुंबई शेअर बाजाराने ४७,७१४.५५ हा आजपर्यंतचा उच्चांक गाठला होता. निफ्टीचा निर्देशांक ५९.४० अंशाने वधारून १३,९३२.६० वर स्थिरावला. निफ्टीनेही आजपर्यंतचा १३,९६७.६० हा आजपर्यंतचा उच्चांक गाठला होता.

हेही वाचा-एलआयसीकडून २ टक्के हिश्श्याची आयसीआयसीआय बँकेला विक्री

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, एसबीआय आणि आयटीसी या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. तर नेस्ले, एनटीपीसी, पॉवरग्रीड, डॉ. रेड्डी, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर घसरले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९०० अब्ज डॉलर रुपयांच्या कोरोनावरील आर्थिक पॅकेजवर स्वाक्षरी केली आहे. कोरोनावरील लस देशात विकसित होण्याच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. त्याचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

हेही वाचा-केंद्राकडून कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध रद्द

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ०.८८ टक्क्यांनी वाढून ५१.४० डॉलर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.