ETV Bharat / business

मतदान निकालाच्या अंदाजाने  शेअर बाजारात घडविला विक्रम; ओलांडला ३९,५०० चा टप्पा

शेअरखानचे वरिष्ठ अधिकारी गौरव दुआ म्हणाले, एक्झिट पोलला बाजाराने चांगला प्रतिसाद दिला आहे. जर निवडणुकीचे निकाल अंदाजाहून चांगले आले तर शेअर बाजाराचा निर्देशांक येत्या आठवड्यात ५ ते ८ टक्के वाढण्याची शक्यता आहे.

शेअर बाजार
author img

By

Published : May 21, 2019, 12:47 PM IST

मुंबई - मतदान निकालाच्या चाचणीत एनडीए सरकार येण्याची शक्यता वर्तविल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात २०० अंशाने वधारून ३९,५६५ वर स्थिरावला होता.

निफ्टीचा निर्देशांक हा ४९.९० अंशाने वधारून ११,८७७.१५ वर पोहोचला. सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात १ हजार ४२१ अंशाने वाढ होवून ३९,३५२ वर पोहोचला होता. तर निफ्टीत ४२१ अंशाची वाढ होवून ११,८२८ वर पोहोचला होता.

एचडीएफसी, बजाज फायनान्स, कोल इंडिया, आरआयएल, बजाज ऑटो, एचयूएल, इंडुसलँड बँक, सन फार्मा, वेदांता, अॅक्सिस बँक आणि एशिय पेंटस यांचे शेअर २.२१ टक्क्यापर्यंत वाढले. टाटा मोटर्स, येस बँक, भारती एअरटेल, टाटा स्टील, एसबीआय, इन्फोसिस, ओएनजीसी आणि टीसीच्या शेअरमध्ये ३.१८ टक्क्यांची घसरण झाली.

शेअरखानचे वरिष्ठ अधिकारी गौरव दुआ म्हणाले, एक्झिट पोलला बाजाराने चांगला प्रतिसाद दिला आहे. जर निवडणुकीचे निकाल अंदाजाहून चांगले आले तर शेअर बाजाराचा निर्देशांक येत्या आठवड्यात ५ ते ८ टक्के वाढण्याची शक्यता आहे.

बहुतांश मतदान निकालाच्या चाचणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत येईल, असे असा अंदाज वर्तविला आहे. विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी सोमवारी १ हजार ७३४.४५ कोटींच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील गुंतवणुकदार संस्थांनी ५४२.७१ कोटींच्या शेअरची विक्री केली आहे.मार्च २०१९ मध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक २,११० अंशाने वधारला होता. त्यानंतर सर्वात अधिक सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली होती.

शेअर बाजारात देखरेख करणारी यंत्रणा कार्यान्वित -

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे निकाल गुरुवारी घोषित होणार आहेत. त्यापूर्वी बाजार नियंत्रक सेबीसह शेअर बाजारात देखरेख करण्यासाठी कडक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे . निवडणूक निकालाच्या तोंडावर शेअर बाजारात ढवळाढवळ करणाऱ्या नियमबाह्य कृत्यावर ही यंत्रणा नजर ठेवणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.