मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 52.94 अंशाने घसरला आहे. स्टेट बँकेचे सर्वाधिक सुमारे १ टक्क्यांनी शेअर घसरले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 52.94 अंशाने घसरून 52,275.57 वर स्थिरावला आहे. निफ्टीचा निर्देशांक 11.55 अंशाने घसरून 15,740.10 वर स्थिरावला. एचडीएफसी ट्विन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.
हेही वाचा-ई-फायलिंग पोर्टल लाँच होताच तांत्रिक त्रुटी; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'हे' केले ट्विट
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
स्टेट बँकेचे सर्वाधिक सुमारे 1 टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ एचडीएफसी ट्विन्स, कोटक बँक, पॉवर ग्रीड आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर घसरले आहेत. दुसरीकडे टेक महिंद्रा, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि एचसीएल टेकचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-नोटाबंदीच्या काळातील व्हिडिओ रेकॉर्ड नष्ट करू नका, आरबीआयचे बँकांना आदेश
रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ रणनीतीकार विनोद मोदी म्हणाले, की शेअर बाजाराचा निर्देशांक अस्थिर राहिला आहे. वित्तीय आणि धातुंच्या शेअर विक्रीवर दबाव दिसून आला आहे. तर आयटी, एफएमसीजी आणि औषधी कंपन्यांचे शेअर वधारले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.53 टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल 71.11 डॉलर आहेत.