ETV Bharat / business

शेअर बाजारासह निफ्टीच्या निर्देशांकात दिवसाखेर किंचित घसरण

author img

By

Published : Feb 10, 2021, 4:48 PM IST

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसभरात ६६६.६४ अंशाने उसळला होता. मात्र, दिवसाखेर १९.६९ अंशाने घसरून ५१,३०९.३९ वर स्थिरावला.

शेअर बाजार न्यूज
शेअर बाजार न्यूज

मुंबई - शेअर बाजाराचा आणि निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर किंचित घसरला आहे. शेअर बाजार गुंतवणुकदारांनी नोंदविलेला नफा आणि जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजार निर्देशांक अस्थिर राहिला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसभरात ६६६.६४ अंशाने उसळला होता. मात्र, दिवसाखेर १९.६९ अंशाने घसरून ५१,३०९.३९ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर २.८० अंशाने घसरून १५,१०६.५० वर स्थिरावला.

हेही वाचा-बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीचा छापा

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, अ‌ॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, ओएनजीसी, एल अँड टी आणि एसबीआयचे शेअर १ टक्क्यांहून अधिक घसरले. तर बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, बजाज फायनान्स, टायटन आणि टीसीएसचे शेअर वधारले.

हेही वाचा-टीसीएस इंग्लंडमध्ये १,५०० जणांना देणार नोकऱ्या

बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार शेअर बाजाराचा निर्देशांक उच्चांकावर पोहोचला असताना गुंतवणुकदारांनी नफा नोंदविण्याची संधी मिळविली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक अस्थिर राहिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.२३ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६१.३६ डॉलर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.