मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर किंचित वधारला आहे. जागतिक बाजारातील बदल्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज अस्थिर राहिला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ७.०९ अंशाने वधारून ४९,७५१.४१ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर ३२.१० अंशाने वधारून १४,७०७.८० वर स्थिरावला.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
ओएनजीसीचे शेअर सर्वाधिक सुमारे ६ टक्क्यांनी वधारले आहेत. तर इंडसइंड बँक, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, एसबीआय आणि एनटीपीसीचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे कोटक बँक, मारुती, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक आणि एचसीएल टेकचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-सोने प्रति तोळा ३३७ रुपयांनी महाग
गेल्या काही दिवसांमध्ये देशांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.८१ टक्क्यांनी वधारून ६४.८८ डॉलर आहेत.
हेही वाचा-दोन दिवसांच्या 'ब्रेक'नंतर पेट्रोल-डिझेलमध्ये पुन्हा दरवाढ