मुंबई - सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारासह निफ्टीच्या निर्देशांकाने नवा विक्रम नोंदविला आहे. मुंबई शेअर बाजार दिवसाखेर ११७ अंशाने वधारला आहे. आरबीआयने आज पतधोरण जाहीर करताना रेपो दर 'जैसे थे' ठेवला आहे. त्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ११७.३४ अंशाने वधारून ५०,७३१.६३ वर स्थिरावला. शेअर बाजाराने दिवसभरात ५१,०० अंशाचा टप्पा ओलांडला होता. निफ्टीचा निर्देशांक दिवसभरात १५,००० चा टप्पा ओलांडला होता. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर २८.६० अंशाने वधारून १४,९२४.२५ वर स्थिरावला.
हेही वाचा-डिजीटल चलनावर आरबीआय लवकरच करणार शिक्कामोर्तब
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर १० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. त्यापाठोपाठ कोटक बँक, डॉ. रेड्डीज, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, मारुती आणि एचसीएल टेकचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण; चांदी महाग
रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी म्हणाले की, आरबीआयने रेपो दर जैसे ठेवला आहे. तसेच रोख्यांच्या बाजारात किरकोळ गुंतवणुकदारांना जीआयटीएल खात्यांमधून सहभागी होण्याचा पर्याय दिला आहे. आरबीआयच्या अशा विविध निर्णयाने गुंतवणुकदारांचा विश्वास वाढला आहे.
बँकिंगचे विशेषत: सार्वजनिक बँकांचे निर्देशांक, औषधी कंपन्या आणि एफएमसीजी कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.९५ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ५९.५६ डॉलर आहेत.