मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ४०० अंशांनी वधारला आहे. एचडीएफसी ट्विन्स, भारती एअरटेल आणि कोटक बँकेचे शेअर वधारले आहेत. शेअर दलालाच्या माहितीनुसार कोरोनावरची लस उपलब्ध होणार असल्याच्या आशेने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
अमेरिकन जैवतंत्रज्ञान कंपनी 'मॉडेरना'ने कोरोनाची लस लोकांवर प्रभावी दिसून आल्याचे म्हटले आहे. या लसीने माणसांची प्रतिकारक्षमता वाढत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. मुंबई शेअर बाजार खुला होताना ४०० अंशांनी वधारून ३०,४५०.७४ वर पोहोचला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक ९१.१० अंशांनी वधारून ८,९१४.३५ वर पोहोचला.
हेही वाचा-देशामध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी मंदी येणार - गोल्डमन सॅच्सचा अंदाज
ओएनजीसीचे शेअर सर्वाधिक ६ टक्क्यांनी वधारले आहेत. भारती एअरटेल, एचडीएफसी, मारुती, बजाज ऑटो, कोटक बँक, हीरो मोटोकॉर्प आणि पॉवरग्रीडचेही शेअर वधारले आहेत. इंड्सइंड बँक, एसबीआय, एशियन पेंट्स आणि अॅक्सिस बँकेचे शेअर घसरले आहेत. मागील सत्रात मुंबई शेअर बाजार १,०६८.७५ अंशांनी वधारून ३०,०२८.९८ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ३१३.६० अंशांनी वधारून ८,८२३.२५ वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी २,५१२.८२ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती.
हेही वाचा-महामारीने बेरोजगारीत वाढ : उबेरच्या ३ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा