ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक १५० अंशाने वधारला; निफ्टी ११,९५० हून अधिक

येस बँकेचे शेअर सर्वाधिक ४.३२ टक्क्यापर्यंत वधारले. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, टाटा स्टील, वेदांत, इंडुसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, एसबीआय आणि सन फार्माचे शेअर वधारले.  तर ओएनजीसीचे शेअर हे १.२५ टक्क्यापर्यंत घसरले.

Share Market
शेअर बाजार
author img

By

Published : Dec 12, 2019, 12:39 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात १५० अंशाने वधारला. अमेरिकेच्या केंद्रीय मध्यवर्ती बँकेने (फेडरल बँक) व्याज दर 'जैसे थे' ठेवले आहेत. तर वर्षभर लवचिक पतधोरण ठेवणार असल्याचे संकेतही फेडरल बँकेने दिले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसत आहेत.

शेअर बाजार निर्देशांक १४९.७५ अंशाने वधारून ४०,५६२.३२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ४७.६० अंशाने वधारून ११,९५७.७५ वर पोहोचला.

हेही वाचा-अ‌ॅमेझॉनची ओनिडाबरोबर भागीदारी; स्ट्रीमिंग सेवेकरता फायर टीव्हीची मिळणार सुविधा

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर -

येस बँकेचे शेअर सर्वाधिक ४.३२ टक्क्यापर्यंत वधारले. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, टाटा स्टील, वेदांत, इंडुसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, एसबीआय आणि सन फार्माचे शेअर वधारले. तर ओएनजीसीचे शेअर हे १.२५ टक्क्यापर्यंत घसरले. भारती एअरटेल, कोटक बँक, पॉवरग्रीड, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसीचे शेअर घसरले.

हेही वाचा-जीएसटी परिषद : करसंकलन घटल्याने जीएसटीचे दर वाढण्याची शक्यता

मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक १७२.६९ अंशाने वधारून ४०,४१२.५७ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ५३.३५ अंशाने वधारून ११,९१०.१५ वर स्थिरावला होता.

जागतिक आर्थिक मंचासह देशात अनुकूल वातावरण-
अमेरिकेच्या अर्थव्यवस्था भक्कम ठेवण्यासाठी फेडरल बँकेने व्याज दरात कोणतेही बदल केले नाहीत. भांडवली बाजारामधून ६०५.४१ कोटी रुपयांच्या शेअरची विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी २३९.८७ कोटींच्या शेअरची विक्री केली.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.