मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक १४३.५१ अंशाने वधारून ३९,७५७.५८ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २६.७५ अंशाने वधारून ११,६६९.१५ वर स्थिरावला. जागतिक बाजारात सकारात्मकता असल्याच्या पार्श्वभूमीवर वित्तीय संस्थांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार बँका आणि वाहन उद्योगांनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या उद्योगांचे शेअर वधारले आहेत.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
इंडसइंड बँकेचे शेअर सुमारे सात टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एसबीआय, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर सर्वाधिक ८ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, टीसीएस, टाटा स्टील, एशिय पेंट्स, बजाज ऑटो, मारुती आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर घसरले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल २.०६ टक्क्यांनी घसरून ३७.१६ डॉलर आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ३२ पैशांनी घसरून ७४.४२ रुपये आहे.