मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १३९ अंशाने वधारला आहे. तर आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि एनटीपीसीचे शेअर वधारले आहेत. विदेशी गुंतवणुकदारांचा ओघ सुरुच राहिल्याने शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने आज दिवसभरात ४६,३०९.६३ हा उच्चांक गाठला होता. मुंबई शेअर बाजार निर्देशांक १३९.१३ अंशाने वधारून ४६,०९९.०१ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ३५.५५ अंशाने वधारून १३,५१३.८५ वर स्थिरावला.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाकडून ८९ लाख करदात्यांना १.४५ लाख कोटी रुपये वितरित
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
ओएनजीसीचे शेअर ६ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ एनटीपीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, टायटन आणि बजाज ऑटोचे शेअर वधारले. दुसरीकडे अॅक्सिस बँक, एम अँड एम, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर घसरले. जागतिक ब्रेंट क्रूड फ्युचरमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.५६ टक्क्यांनी घसरून ४९.९७ डॉलर आहेत.
हेही वाचा-केंद्र सरकार आयआरसीटीसीमधील २० टक्के हिस्सा विकणार