ETV Bharat / business

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात ३०० अंशांनी घसरण; 'हे' आहे कारण - Sensex live news

अॅक्सिस बँकेचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ इंडुसइंड बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, इन्फोसिस, एचडीएफसी ट्विन्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर घसरले आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : May 29, 2020, 12:53 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ३०० अंशांनी सकाळच्या सत्रात घसरला आहे. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरमध्ये घसरण झाली आहे.

जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीचा मुंबई शेअर बाजारावरही परिणाम झाला आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३१२.३४ अंशांनी घसरून ३१,८८८.२५ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ९५.७५ अंशांनी घसरून ९,३९४.३५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

अॅक्सिस बँकेचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ इंडुसइंड बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, इन्फोसिस, एचडीएफसी ट्विन्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा- स्टेट बँकेचा धक्का; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात

मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक ५९५.३७ अंशांनी वधारून ३२,२००.५९ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १७५.१५ अंशांनी वधारून ९,४१०.१० वर स्थिरावला होता.

हेही वाचा-'इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात मोठी संधी'

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी २ हजार ३५४.१४ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या विकासदराची आकडेवारी आज जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

हेही वाचा-टोळधाडीचे आव्हान; कृषी मंत्रालय विदेशामधून मागविणार फवारणी यंत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.