मुंबई - गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली घसरण शेअर बाजारातही आजही सुरुच आहे. सकाळच्या सत्रात १०३.५० अंशाची घसरण होवून निर्देशांक ३७, ९२७.६३ वर पोहोचला. विदेशी गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात काढून घेतलेला निधी आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेने शेअर बाजारात घसरण होत आहे.
निफ्टीच्या निर्देशांकात २८.५० अंशाची घसरण होवून निर्देशांक ११,३१७.७० वर पोहोचला. गेल्या सत्रात शेअर बाजार निर्देशांकात ३०५.८८ अंशाची घसरण झाली होती.
या कंपन्यांचे शेअर घसरले -वधारले
सकाळच्या सत्रात येस बँक, एचडीएफसीचे सर्वात अधिक २.४७ टक्क्यापर्यंत शेअर घसरले. तर बजाज ऑटो, टाटा मोटर्स, एसबीआय, एल अँड टी, इंडुसइंड बँक, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर १.५६ टक्क्यापर्यंत घसरले.
कोटक बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स आणि एनटीपीसीचे शेअर हे १.७५ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १ हजार ९१६.९१ कोटी रुपयांच्या शेअरची सोमवारी विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १ हजार ८२९.९० कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.