ETV Bharat / business

शेअर बाजारात १०० अंशाची घसरण; मूडीजने देशाचे पतमानांकन घटविल्याचा परिणाम

जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक स्थिती आणि विदेशी गुंतणूकदारांच्या निधीचा ओघ असूनही शेअर बाजार निर्देशांक घसरला आहे. पतमानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने देशाचे पतमानांकन कमी केल्याने निर्देशांक घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

संग्रहित - शेअर बाजार
author img

By

Published : Nov 8, 2019, 12:24 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात १०० अंशाची घसरण झाली आहे. तर निफ्टीचा निर्देशांक १२,००० हून कमी झाला आहे. मूडी इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने देशाच्या अर्थव्यवस्थेचे पतमानांकन घटविले आहे. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजार व निफ्टीच्या निर्देशांकात घसरण झाली आहे.

शेअर बाजार निर्देशांक १०२.३० अंशाने घसरून ४०,५५१.४४ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा २८.२५ अंशाने घसरून ११,९८३.८० वर पोहोचला.

हेही वाचा-पीएमसी बँकेच्या स्थितीवर जवळून देखरेख; फॉरेन्सिक लेखापरीक्षणही सुरू - आरबीआय

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
सन फार्मा, एचयूएल, भारती एअरटेल, एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर हे १.६९ टक्क्यांनी घसरले आहेत. तर येस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, एम अँड एम, टाटा मोटर्स आणि ओएनजीसीचे शेअर हे २.२६ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.

मागील सत्रात शेअर बाजार निर्देशांक १८३.९६ अंशाने वधारून ४०.६५३.७४ अंशावर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून ९२६.६० कोटींच्या शेअरची गुरुवारी खरेदी केली . तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ६३५.५९ कोटींच्या शेअरची विक्री केली आहे.

जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक स्थिती आणि विदेशी गुंतणूकदारांच्या निधीचा ओघ असूनही शेअर बाजार निर्देशांक घसरला आहे. पतमानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने देशाचे पतमानांकन कमी केल्याने निर्देशांक घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

काय म्हटले आहे मूडीजने?
मूडीजने देशाते पतमानांकन हे स्थिरऐवजी (स्टेबल) नकारात्मक (नेगेटिव्ह) केले आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत जोखीम वाढत आहे. अशा स्थितीत विकासदर हा अंशत: पूर्वीहून कमी राहिल, असा अंदाज मूडीजने वर्तविला आहे.

रुपया डॉलरच्या तुलनेत सकाळच्या सत्रात ३० पैशांनी घसरून ७१.२७ वर पोहोचला.

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.