मुंबई - शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात २५० अंशाची घसरण होवून निर्देशांक ३८, ०७१ वर पोहोचला. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंध ताणले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात पडझड झाली आहे. निफ्टीही ६३.६५ अंशाने घसरून ११, ४३४ वर पोहोचला.
आरआयएल, ओएनजीसी, वेदांता, एनटीपीसी, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, एचडीएफसी ट्विन्स, एचयूएल आणि एसबीआयच्या शेअरमध्ये १.५७ टक्क्यांची घसरण झाली. तर भारती एअरटेल, पॉवरग्रिड, इंडुसलँड बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, येस बँक आणि सन फार्मा यांचे शेअर ०.८२ टक्क्याने वधारले. मंगळवारी विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी ६४५.०८ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणुकदार संस्थांनी ८१८.८४ कोटी किंमतीच्या शेअरची खरेदी केली आहे.
मंगळवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३२४ अंशाने घसरन होऊन बाजार ३८,२७६ वर बंद झाला. तर निफ्टीच्या निर्देशांकातही १०० अंशाची घसरण झाली होती. निफ्टी ११, ४९७.९० वर बंद झाला होता.