ETV Bharat / business

इन्फोसिसच्या शेअर घसरणीचा बाजाराला फटका, निर्देशांकात १३५ अंशाची घसरण

एका जागल्याने (व्हिसलब्लोअर) इन्फोसिसमध्ये अनुचित प्रकार झाल्याचा  दावा केला. त्यामुळे इन्फोसिसच्या शेअरला सकाळच्या सत्रात फटका बसला. कंपनीचे शेअर १५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरले.

शेअर बाजार
author img

By

Published : Oct 22, 2019, 12:36 PM IST

मुंबई - गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात इन्फोसिसचे शेअर खरेदी करण्याला हात आखडता घेतला. याचा परिणाम म्हणून शेअर बाजार निर्देशांकात १३५ अंशाची घसरण झाली.

एका जागल्याने (व्हिसलब्लोअर) इन्फोसिसमध्ये अनुचित प्रकार झाल्याचा दावा केला. त्यामुळे इन्फोसिसच्या शेअरला सकाळच्या सत्रात फटका बसला. कंपनीचे शेअर १५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरले. क्षेत्रनिहाय असलेला निफ्टीमधील आयटी निर्देशांक घसरलेला (रेड) होता.

शेअर बाजारात सकाळी १० वाजून ५१ मिनिटाला निर्देशांक १३५.०७ अंशाने घसरून ३९,१६३.३१ वर पोहोचला होता. मागील सत्रात शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ३९,२९८.३८ वर पोहोचला होता. निफ्टीचा र्देशांक २६.७० अंशाने घसरून ११,६३५.१५ वर पोहोचला. सार्वजनिक कंपन्यांमधील हिस्सेदारी विकण्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कंपन्यांचे शेअरही घसरले.

Intro:Body:

Desk-Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.