मुंबई - कोरोनाचे संकट आणि जागतिक अर्थव्यवस्थांमधील खराब परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारांची पडझड सुरूच आहे. आज सेन्सेक्समध्ये १,११५ अंशांची मोठी घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात निराशाजनक परिस्थिती असताना आज प्रमुख निर्देशांकांनी मोठी आपटी नोंदवली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६ हजार ५५० अंकांवर स्थिरावला.
-
Sensex falls 1,114.8 points, Nifty slips to 10,805.5 pic.twitter.com/BSxdCqzXSn
— ANI (@ANI) September 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sensex falls 1,114.8 points, Nifty slips to 10,805.5 pic.twitter.com/BSxdCqzXSn
— ANI (@ANI) September 24, 2020Sensex falls 1,114.8 points, Nifty slips to 10,805.5 pic.twitter.com/BSxdCqzXSn
— ANI (@ANI) September 24, 2020
सेन्सेक्ससह निफ्टीनेही ३५० अंकांच्या घसरणीने खराब कामगिरी नोंदवली. मोठ्या पडझडीनंतर निफ्टी १०,८०५ अंकांवर आला. शेअर विक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याने भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ३ लाख ९२ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. जगभरातील कोरोना परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.