मुंबई - बँकिंग आणि ऑटोच्या शेअरची विक्री झाल्याने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १,०६९ अंशांनी घसरण झाली आहे. केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज घोषित करूनही गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीत उत्साह दाखविला नाही.
मुंबई शेअर बाजारात १,०६८.७५ अंशांनी घसरून ३०,०२८.९८ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ३१३.६० अंशांनी घसरून ८,८२३.२५ वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
इंडुसइंड बँकेचे १० टक्क्यापर्यंत सर्वाधिक शेअर घसरले आहेत. एचडीएफसी, मारुती सुझुकी, अॅक्सिस बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे टीसीएस, इन्फोसिस, आयटीसी आणि एचसीएल टेकचे शेअर वधारले आहे.
हेही वाचा-राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिगटाची आर्थिक पॅकेजवर बैठक
केंद्रीय गृहमंत्रालयाने ३१ मेपर्यंत टाळेबंदी वाढविल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचे आनंद राठी इक्विटी रिसर्चचे नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले. शेअर बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे आर्थिक पॅकेज नसल्याचेही सोळंकी यांनी सांगितले. रुपया डॉलरच्या तुलनेत ३३ पैशांनी घसरून ७५.९१ वर पोहोचला आहे.
हेही वाचा-टाळेबंदीचा फटका; स्विग्गीच्या १,१०० कर्मचाऱ्यांनी गमाविली नोकरी