नवी दिल्ली - गेल्या आठवड्यापासून शेअर बाजाराची सुरू असलेली घसरण आजही चालूच राहिली आहे. शेअर बाजार सकाळी उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 2 हजार अंशानी कोसळला आहे. शेअर बाजारातील घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी सुमारे ५ लाख कोटी रुपये गमावले आहेत.
रिलायन्सच्या शेअरमध्ये गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक घसरण
रिलायन्सच्या शेअरमध्ये गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक घसरण झाली आहे. रिलायन्सचे शेअर हे १३.७९ टक्क्यांनी घसरून दुपारी १ वाजून ३४ मिनिटाला १,०९४.९५ रुपये प्रति शेअर झाले आहेत. मागील सत्रात रिलायन्सच्या शेअरची किंमत १ हजार १०० रुपये होते. स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेमध्ये ४९ टक्के हिस्सा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर येस बँकेच्या शेअरच्या किमती सुमारे ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
हेही वाचा-ठरलं! येस बँकेत गुंतवणूक करण्याची स्टेट बँकेने 'ही' ठरविली मर्यादा
दुपारी १२ वाजता
शेअर बाजारातील घसरणीनंतर गुंतवणूकदारांना सुमारे ५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शेअर बाजारामधील सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. ३० सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर निर्देशांकात १५१५.०१ अंशांनी घसरून निर्देशांक ३६,०६१.६१ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ४१७.०५ अंशांनी घसरून १०,५७२.४० वर पोहोचला. शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांनी १ कोटी ३९ लाख ३९ हजार ६४०.९६ रुपयांचे भांडवली मूल्य गमाविले आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर
सकाळी ११.५९ वाजता
डॉलरच्या तुलनेत १६ पैशांनी घसरून रुपयाचे मूल्य ७४.०३ झाले आहे. कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेसह देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती असल्याने रुपयाचे अवमूल्यन झाले आहे.