ETV Bharat / business

आरबीआयकडून जीडीपी कमी राहण्याचा अंदाज; शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशाची घसरण - Sensex

विविध निर्देशांकांतून मागणी कमी राहिल्याचे दिसून आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.  शेअर बाजार निर्देशांक दुपारी १२ वाजून ५४ मिनिटाला  ९७.०९ अंशाने घसरून ३८,००९.७८ वर पोहोचला. तर निफ्टी ७३.४० अंशाने घसरून ११,२४०.६० वर पोहोचला.

संग्रहित - शेअर बाजार
author img

By

Published : Oct 4, 2019, 2:25 PM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) ६.१ टक्के राहिल, असा पतधोरणात अंदाज आज व्यक्त केला. अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी घसरणार असल्याच्या शक्यतने शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशाची घसरण झाली. यापूर्वी आरबीआयने राष्ट्रीय सकल उत्पन्न चालू आर्थिक वर्षात ६.९ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला होता.

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर हा अंदाजापेक्षा लक्षणीय कमी राहणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. विविध निर्देशांकांतून मागणी कमी राहिल्याचे दिसून आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. शेअर बाजार सकाळच्या सत्रात ३०० अंशाने वधारला होता. मात्र आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली. शेअर बाजार निर्देशांक दुपारी १२ वाजून ५४ मिनिटाला ९७.०९ अंशाने घसरून ३८,००९.७८ वर पोहोचला. तर निफ्टी ७३.४० अंशाने घसरून ११,२४०.६० वर पोहोचला.

शेअर बाजार निर्देशांक दुपारी १ वाजता २४०.६६ अंशाने घसरून ३७,८६६.२१ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक हा ७१.८५ अंशाने घसरून ११,२४२.१५ वर पोहोचला होता.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
कोटक बँक, भारती एअरटेल, एल अँड टी, पॉवरग्रीड, आयटीसी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एचयूएलचे शेअर ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर इंडसइंड बँक, एम अँड एम, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी, सन फार्मा, हिरो मोटोकॉर्प आणि वेदांतचे शेअर हे २ टक्क्यांनी वधारले. मुंबई शेअर बाजारात बँकांचे शेअर १.१६ टक्क्यांनी घसरले.

हेही वाचा-आरबीआयकडून पतधोरण जाहीर.. व्याजदर आणखी स्वस्त; रेपो दरात २५ बेसिस पाँईटने कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणासाठी रेपो दर हा २५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. ही केंद्रीय मध्यवर्ती बँकेकडून सलग पाचव्यांदा कपात झाली आहे. आरबीआयचा रेपो दर ५.४० टक्क्यांवरून ५.१५ टक्के होणार आहे.

हेही वाचा-पीएमसी बँकेतून आता काढता येणार २५ हजार रूपये...

आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार चेतन घाटे, पमी दुआ, मायकल देवव्रत पात्रा, बिभू प्रसाद कानुनगो आणि शक्तिकांत दास यांनी रेपो दर २५ बेसिस पाँईटने कमी करण्यासाठी मत दिले. तर रविंद्र ढोलकिया यांनी ४० बेसिस पाँईटने रेपो दरात कपात करण्यासाठी मत दिले होते.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.