मुंबई - डॉलरच्या तुलनेत ३० पैशांनी घसरण होवून रुपयाचे मूल्य ७४.१७ झाले आहे. कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारात घसरण होत आहे.
इंटरबँक फॉरेन एक्सचेंजमध्ये बाजार खुला होताना रुपयाचे मूल्य हे ७३.९९ रुपये होते. त्यानंतर बाजार बंद होताना रुपयाची डॉलरच्या तुलनेत ३० पैशांनी घसरण झाली. रुपयाचे मूल्य एका डॉलरच्या तुलनेत ७४.१७ रुपये झाले आहे. खनिज तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल ३० टक्क्यांनी घसरले आहेत. सौदी अरेबिया आणि रशियामधील वादाने खनिज तेलाच्या किमतीचे युद्ध सुरू झाले आहे.
हेही वाचा-येस बँक : गतवर्षात मार्च ते सप्टेंबरदरम्यान ग्राहकांनी १८ हजार कोटी घेतले काढून!
फॉरेक्स ट्रेडर्स म्हणाले, रुपयाचे मूल्य घसरण्याची विविध कारणे आहेत. कोरोनाचा जगभरात वाढलेला प्रसार आणि खनिज तेलाचे घसरलेल्या दराने रुपयाची घसरण झाली आहे.
हेही वाचा-येस बँक : प्रियंका गांधींनी कपूरांना विकलेल्या पोट्रेट प्रकरणाची ईडीकडून चौकशी
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारातील ६ हजार ५९५.५६ कोटी रुपयांचे शेअर सोमवारी विकले आहेत. शेअर बाजार बंद होताना निर्देशांकात १,९४१ अंशांनी घसरण झाली आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकात ५३८ अंशांनी घसरण झाली आहे.