मुंबई - भारतीय चलनाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झाले आहे. बाजार खुला होताना रुपया डॉलरच्या तुलनेत ३० पैशांनी घसरून ७१.९४ वर पोहोचला. विदेशात मजबूत झालेले अमेरिकन चलन आणि शेअर बाजारातील नकारात्मक स्थिती या कारणांनी रुपया घसरला आहे.
संसर्गजन्य कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने चीनमध्ये २,५९२ जणांचा मृत्यू झाला आहे. खनिज तेलाचे दर कमी झाल्याने रुपयाची घसरण काही प्रमाणात थांबू शकल्याचे फॉरेक्स ट्रेडर्स यांनी सांगितले.
हेही वाचा-जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची पाचव्या स्थानावर झेप; युके, फ्रान्सला टाकले मागे
रुपयाचे मूल्य शुक्रवारी बाजार बंद होताना ७१.६४ रुपये होते. तर ब्रेन्ट क्रुड तेलाचा दर प्रति बॅरल २.५१ टक्क्यांनी घसरून ५७.०३ डॉलरवर पोहोचला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून १,४९५.२५ कोटी रुपयांच्या शेअरची शुक्रवारी खरेदी केली.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात ४५० अंशांनी घसरण; कोरोनाच्या प्रसाराचा परिणाम