नवी दिल्ली – सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ बाजारपेठेत महागाई वाढली आहे. किरकोळ बाजारपेठे जुलैमध्ये महागाई 6.93 टक्के झाली आहे. अन्नाच्या वर्गवारीत वाढलेली किंमतीने जुलैमध्ये महागाई वाढल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (सीपीआय) अन्नाच्या वर्गवारीत महागाई ही जुलैमध्ये 9.62 टक्के झाली आहे. किरकोळ बाजारपेठेतील महागाई जूनमध्ये 6.23 टक्के होती. तर अन्नाच्या वर्गवारीत महागाई ही 8.72 टक्के होती.
केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला महागाईचा दर जास्तीत जास्त 4 टक्के तर कमी कमी 2 टक्के ठेवण्याचे बंधन घालून दिले आहे. त्यामुळे महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयकडून द्विमासिक पतधोरणात बदल करण्यात येतो. मागील पतधोरणात आरबीआयने रेपो दर हा 'जैसे थे' ठेवला होता. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुढील सहामाहीत महागाई वाढेल, असा अंदाज पतधोरण जाहीर करताना केला होता.