ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात; जाणून घ्या, आजचा दर - Indian Oil Corporation

जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रति बॅरल ७० डॉलरहून अधिक झाला होता. अमेरिका-इराणमधील तणाव निवळल्याने जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर कमी झाले आहेत. हे दर सध्या, प्रति बॅरल ६४ डॉलरवर पोहोचले आहेत.

Petrol diesel prices
पेट्रोल डिझेल दर
author img

By

Published : Jan 16, 2020, 1:20 PM IST

नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचे (क्रूड ऑईल) दर घसरल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दरही आज कमी झाले आहेत. पेट्रोलचा दर प्रति लिटर १५ पैशांनी तर डिझेलचा दर प्रति लिटर १४ पैशांनी उतरले आहेत.

डिझेलचा दर १४ पैशांनी कमी होवून दिल्लीत प्रति लिटर ६८.९२ रुपये आहे. मुंबईत डिझेल प्रति लिटर ७१.२९ रुपये, कोलकाता आणि चेन्नईत ७२.८३ रुपये आहे. पेट्रोल-डिझेलचे दर बुधवारी स्थिर राहिले होते. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७५.५५ रुपये, मुंबईत ८१.१४ रुपये, कोलकात्यात ७८.२३ रुपये आणि चेन्नईत ७८.४९ रुपये आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराची आकडेवारी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण समितीमध्ये केला 'हा' मोठा फेरबदल

जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रति बॅरल ७० डॉलरहून अधिक झाला होता. अमेरिका-इराणमधील तणाव निवळल्याने जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर कमी झाले आहेत. हे दर सध्या, प्रति बॅरल ६४ डॉलरवर पोहोचले आहेत.

हेही वाचा-शेअर बाजारात आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक; ओलांडला ४२,००० चा टप्पा

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर हे जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाच्या दरावर अवलंबून असतात. तसेच रुपया-डॉलरमधील विनिमय दराचाही पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम होतो. देशात लागणाऱ्या खनिज तेलापैकी ८० तेलइंधन भारतात आयात करण्यात येते.

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.