ETV Bharat / business

Paytm आणणार 16,600 कोटींचा IPO, गुंतवणूकदारांसाठी यंदाच्या दिवाळीमध्ये मोठी संधी

गुंतवणूकदारांसाठी यावर्षी पेटीएमने मोठी संधी उपलब्ध केली आहे. देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असणारी पेटीएम यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या आसपास देशातील सर्वात मोठा आयपीओ आणणार आहे. 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ सुरू करण्यासाठी पेटीएमला सेबीची मंजुरी मिळाली आहे.

पेटीएम
Paytm
author img

By

Published : Oct 24, 2021, 7:51 AM IST

नवी दिल्ली - सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचे पेव सुटलं आहे. काही जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगले पैसे मिळाले देखील आहेत. IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ सुरू करण्यासाठी पेटीएमला सेबीची मंजुरी मिळाली आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. यापूर्वी 2010 मध्ये कोल इंडिया लिमिटेडने 15000 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता.

इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, कंपनी ऑफरचा आकार सुमारे 1,000 ते 2,000 कोटी रुपयांनी वाढवू शकते. म्हणजेच या IPO चा एकूण आकार 18,000 कोटी रुपये असू शकतो. ऑफर फॉर सेल अंतर्गत, पेटीएमचे विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकतील. कंपनी प्राथमिक बाजारात 8,300 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. उर्वरित 8,300 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल (म्युच्युअल फंड आणि भागधारक कंपन्या) मध्ये विकले जातील.

जाणून घ्या शेअरची किंमत काय असेल?

चीनी उद्योगपती जॅक माच्या अँट ग्रुप व्यतिरिक्त, अलीबाबा सिंगापूर, एलिवेशन कॅपिटल, सॉफ्टबँक व्हिजन फंड आणि बीएच इंटरनॅशनल होल्डिंग्सने देखील पेटीएममध्ये गुंतवणूक केली आहे. अहवालानुसार, पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लिस्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पेटीएम 1.47-1.78 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन हवे आहे. अमेरिकास्थित मूल्यमापन तज्ञ अश्वथ दामोदरन यांनी कंपनीच्या सूचीबद्ध नसलेल्या शेअर्सचे मूल्य 2,950 रुपये प्रति शेअर केले आहे. IPO ची किंमत 3000 ते 3200 पर्यंत असू शकते. पेटीएमच्या आयपीओचे संचालन Morgan Stanley करू शकतात. आतापर्यंत याचा दावा Citigroup Inc. आणि JPMorgan Chase & Co. करत आहे.

पेटीएम नफा कमावू शकतो -

शेअर बाजारात आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांसाठी सध्या चांगले वातावरण असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनानंतर, छोटे गुंतवणूकदार देखील चांगले गुंतवणूक पर्याय शोधत आहेत. ते प्राथमिक बाजारपेठेत रस घेत आहे. गेल्या वर्षाच्या नुकसानीनंतर पेटीएम 2021-22 मध्ये नफा कमावू शकतो. त्यामुळे खरेदीदारांचा कल त्याच्या आयपीओकडे असेल. आतापर्यंत, कंपनीकडून असे सांगितले गेले आहे, की ते नुकसान भरून काढण्यासाठी नव्हे तर व्यवसाय वाढवण्यासाठी आयपीओ आणत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. लक्षणीय म्हणजे, कोरोना काळात पेटीएमला 2020-21 मध्ये 4,783 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

गुंतवणूकदारांचे ब्रँडिंग मजबूत -

कंपनीवर जगातील आघाडीच्या गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवला आहे. पेटीएम ही एक भारतीय स्टार्टअप कंपनी आहे. पण सध्या तिचे नियंत्रण परदेशी कंपनीच्या हातात आहे. हे FDI नियमांमुळे आहे. चीनमधील एंट ग्रुपचा कंपनीत सर्वाधिक 30.33 टक्के हिस्सा आहे. या व्यतिरिक्त, जपानच्या सॉफ्ट बँककडे 18.73%, एलिव्हेशन कॅपिटल 17.65%, अलिबाबा 7.32%, विजय शेखर शर्मा 14.97% आणि इतर 11 टक्के आहेत.

पेटीएमचे बाजार मूल्य -

  • सीईओ विजय शेखर शर्मा यांच्या मते, पेटीएमचे 20 दशलक्षाहून अधिक व्यापारी भागीदार आहेत आणि त्याचे युजर्स दरमहा 1.4 अब्ज व्यवहार करतात.
  • कंपनीने आपला व्यवसाय वाढवला आहे. डिजिटल पेमेंट व्यतिरिक्त, कंपनी बँकिंग, क्रेडिट कार्ड, वित्तीय सेवा, संपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल वॉलेट सुविधा देखील प्रदान करत आहे.
  • PhonePe, Google Pay, Amazon Pay आणि WhatsApp Pay असतानाही पहिल्या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी केली.

आयपीओ म्हणजे काय?

लोकांकडून भांडवलाची मागणी किंवा पैशाची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला "पब्लिक इश्‍यू' किंवा "इनिशिअल पब्लिक ऑफर' Initial Public Offering म्हणजेच "आयपीओ' (IPO) असे म्हणतात. मराठीत प्राथमिक समभागविक्री असा शब्द वापरला जातो. कंपनी व्यवसाय वाढीसाठी आयपीओ काढते. एखादी कंपनी व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज देखील घेऊ शकते, पण कर्जाला मर्यादा असतात, तसेच घेतलेले कर्ज ठराविक वेळेत फेडावे लागते. त्यावर व्याज देखील द्यावे लागते. जर त्या कंपनीने आयपीओ काढला तर त्यांना पैसे देखील परत करावे लागत नाहीत, त्याबरोबरच व्याज देखील भरावे लागत नाही. त्यामुळे अनेक कंपन्या चांगला विस्तार व्हावा यासाठी आयपीओ काढतात.

हेही वाचा - PAYTM CASHBACK मिळणार प्रत्येक व्यवहारावर, जाणून घ्या अधिक माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.