नवी दिल्ली - वाहन उद्योगातील मंदीचे सावट वर्षाखेरही कायम राहिले आहे. देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत डिसेंबरमध्ये १.२४ टक्के घसरण झाली आहे. डिसेंबरमध्ये २ लाख ३८ हजार ७५३ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी २ लाख ३५ हजार ७८६ वाहनांची डिसेंबरमध्ये विक्री झाली होती.
देशातील कारच्या विक्रीत ८.४ टक्के घसरण झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये १ लाख ५५ हजार १५९ कारची विक्री झाली होती. डिसेंबर २०१९ मध्ये १ लाख ४२ हजार १२६ कारची विक्री झाली. मोटरसायकलच्या विक्रीतही डिसेंबरमध्ये १२.०१ टक्के घसरण झाली आहे. डिसेंबरमध्ये ६,९७,८१९ मोटरसायकलची विक्री झाली. तर गतवर्षी डिसेंबरमध्ये ७,९३,०४२ मोटरसायकलची विक्री झाली होती.
हेही वाचा-अॅमेझॉन संस्थापक जेफ बेझोस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता
व्यापारी वाहनांच्या विक्रीत डिसेंबरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १२.३२ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर डिसेंबरमध्ये गतवर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत १३.०८ टक्क्यांची घसरण झाली आहे. प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीत डिसेंबरमध्ये १२.७५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
हेही वाचा-या' बँकेच्या १५ हजार कर्मचाऱ्यांनी ९ महिन्यात सोडल्या नोकऱ्या