ETV Bharat / business

सौदीतील प्रकल्पावरील हल्ल्याचा 'भडका'; कच्च्या तेलाच्या दरात १० टक्के भाववाढ

author img

By

Published : Sep 16, 2019, 2:19 PM IST

कच्च्या तेलाचे दर दर्शविणारा निर्देशांक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट टेक्सास इंटरमिडियिटमध्ये १०.६८ टक्क्यांनी म्हणजे ६०.७१ डॉलरने दर वाढले आहेत. तर ब्रेंच क्रुड म्हणजे जागतिक तेलाची बाजारपेठीचे दर दशर्विणाऱ्या निर्देशांकात ११.७७ टक्क्यांनी म्हणजे ६७.३१ डॉलरपर्यंत दर वाढले आहेत.

संग्रहित - तेल प्रकल्प

हाँगकाँग - जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत. जगाला मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा करणाऱ्या सौदी अरेबियाच्या दोन तेल प्रकल्पावर मागील आठवड्यात ड्रोनद्वारे हल्ला झाला. त्याचा परिणाम म्हणून सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे.

ब्रेंटमध्ये कच्च्या तेलाचे दर हे एका बिंदूला २० टक्क्यांनी वाढले होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडियिटमध्ये सुमारे १५ टक्क्यांनी वाढले होते.

हेही वाचा-उर्जा वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या थकबाकीत ५७ टक्क्यांची वाढ; ७३ हजार कोटींहून अधिक बोजा

मध्यपूर्वेत तणावाची स्थिती-
तेहरानचे समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांनी सौदीच्या तेल प्रकल्पावर हल्ला केला. हल्लेखोरांना उत्तर देण्यासाठी अमेरिका सुरक्षितरित्या बंद (लॉक्ड) आणि पूर्ण तयारीनिशी (लोडेड) होती, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी विधान केले. या हल्ल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जबाबदार धरले आहे. तसेच इराणवर लष्करी हल्ला करण्याचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा-घाऊक बाजारपेठेतील महागाईचा निर्देशांक ऑगस्टमध्ये 'जैसे थे', १.०८ टक्क्यांची नोंद

अमेरिका भागीदारांबरोबर काम करणार असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी सांगितले. उर्जा बाजारपेठेत पुरेसा पुरवठा होईल याची अमेरिका खात्री देत असल्याचेही ते म्हणाले. आक्रमणाबद्दल इराणला जबाबदार धरण्यात येणार असल्याचा त्यांनी सूचका इशारा दिला आहे.

हेही वाचा-जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरवाढीचा चटका; शेअर बाजारात ३०० अंशाने पडझड

इराणने सौदी तेल प्रकल्पावर हल्ला केल्याचे अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले आहेत. मध्यपूर्वेत यापूर्वीही तेलाच्या टँकरवर झालेल्या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरविण्यात आले होते. मध्यपूर्वेतील तणाव वेगाने वाढत आहेत. याचा अर्थ तेलाच्या बाजारपेठेवर या आठवडाभर परिणाम होणार आहे, असे मत ओएएनडीएचे वरिष्ठ बाजार विश्लेषक जेफ्री हॅलींनी व्यक्त केले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.